पिंपरी : जाब विचारला म्हणून तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – हातावर चहा सांडल्याचा जाब विचारला म्हणून चौघांनी एकावर कोयत्याने वार केल्याची घटना शिवार चौक, रहाटणी येथे घडली. हा प्रकार रविवारी (दि. 1) दुपारी पावणेचारच्या सुमारास घडला.

राधेशाम भवरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह धाऱ्या घोलप व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कौशल कैलास मौर्य (18, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल हा त्याचा मित्र शिवम ठाकूर आणि अन्य दोन मित्रांसोबत शिवार चौकात नाष्टा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी शिवम याच्या हातावर चहा सांडला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कौशल याला आरोपींनी मारहाण केली. राधेशाम याने कौशल याच्या डोक्यावर, पायावर कोयत्याने वार केले. यामध्ये कौशल गंभीर जखमी झाला. तर आरोपीच्या अन्य साथीदारांनी गट्टू फेकून मारले. वाकड पोलिसांनी राधेशाम याला अटक केली आहे. तपासवाकड पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com