पिंपरी : पिंपळे गुरव मध्ये पावणे सात लाखाची घरफोडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – राहते घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून सहा लाख 67 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.

शांताराम पोपट चव्हाण (41, रा. क्रांतीनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताराम शुक्रवारी (दि. 22) दुपारी साडेचारच्या सुमारास कुटुंबियांसह गावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातील लाकडी कपाटातील 33 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6 लाख 67 हजार 400 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रविवारी पहाटे सव्वाबाराच्या सुमारास शांताराम घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com