Pimpri : तरुणाच्या मृत्युनंतर नातेवाईकांची हॉस्पिटलची तोडफोड; कर्मचार्‍यांना केली बेदम मारहाण

पिंपरी : तरुणाच्या मृत्युनंतर देहुरोड कँटोंमेट हॉस्पिटल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांनी तोडफोड करुन तेथील कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केली. ही घटना देहुरोडमधील कँटोंमेंट हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी घडला.

याप्रकरणी डॉ़ श्रीनिवास चाटे (वय ३१, रा. न्यू सांगवी) यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन सुरज कटारे, नागेश अवघडे, रामस्वामी राजल्ले, सुरज डेव्हिड, योगेश डेव्हिड, बंटी कटारिया व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. कँटोंमेंट हॉस्पिटलमध्ये सागर अर्जुन कटारे (वय २८) यांचा उपचार सुरु असताना मृत्यु झाला. हे समजताच हॉस्पिटलच्या आवारात त्याचा चुलत भाऊ सुरज कटारे व इतरांनी बेकायदा जमाव जमवून तेथील कार्यालयात शिरुन वॉर्ड बॉय ओंकार राजे, स्वीपर ऋषिकेश श्रीधर पिंजन, वॉचमन कुणाल वाघमारे यांना हाताने मारहाण केली. हॉस्पिटलच्या रुमची तोडफोड करुन शासकीय कामात अडथळा आणला आहे.