घरकुल, चिखली मध्ये अडीच लाखाची घरफोडी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राहते बंद घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख 39 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 11) दुपारी एक ते रात्री आठ या कालावधीत घरकुल, चिखली येथे घडली.

या प्रकरणी मुक्ता भगवान जाधव (45, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी दुपारी एक ते रात्री आठ या कालावधीत कुलूप लावून बंद होते.

दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन लाख 39 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. तपास चिखली तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/