अजित पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘…तर लशींचा तुटवडा निर्माण झाला नसता’

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातून परदेशात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. ‘आपल्या देशात उत्पादन केलेल्या लशी बाहेरच्या देशात पाठवायची गरज नव्हती, त्या असत्या तर बरंच लसीकरण पार पडलं असतं, असे अजित पवार म्हणाले.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जगभरातील माध्यमांकडून केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या देशात उत्पादन केलेल्या लशी बाहेरच्या देशात पाठवायची गरज नव्हती. त्या लशी आपल्याकडे असत्या तर बरेच लसीकरण पार पडले असते. किमान आता जेवढ्या लशी बाहेर दिल्या त्या तरी परत आणाव्यात. सुरुवातीला आपल्या देशात तयार झालेली लशी परदेशात द्यायची गरज नव्हती, आता आपल्याला तुटवडा भासला नसता’.

तसेच 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरणाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यानुसार, अनेक वेगवेगळ्या मागण्या होत आहेत. राज्य सरकारने 12 कोटी लशी विकत घेण्याची तयारी केली आहे. सीरम संस्था आणि भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासाठी तयार आहे. तसेच आता एकदाच लस घेतली तरी चालते अशी बातमी आली आहे. सगळेच नवीन असल्याने नक्की काही समजत नाही. जे नवीन आहे त्याची माहिती घेतली जात आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.