Pimpri : अवैधरित्या दारुची वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाच्या काळात अवैधरित्या देशी-विदेशी दारुची( liquor) वाहतूक करणाऱ्या तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दारु( liquor) आणि वाहनासह एकूण 5 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.28) रात्री साडे आठच्या सुमारास चाकण येथील मेदनकरवाडी येथे केली.

PM Jan-Dhan Account : तुमचे जन धन खाते आहे ? मग घ्या 1.3 लाखांचा लाभ, जाणून घ्या

स्वप्निल नवनाथ काळढोके (वय-28 रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, ता. खेड), लक्ष्मण श्रीकांत जाधवर (वय-28 रा. शिवगणेशनगर, धावडे वस्ती, भोसरी) तसेच शेप वाईन्सचे मालक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्यावर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘आमदार मोहिते राजकारणातील ‘ब्लॅकमेकर्स’, त्यांना त्यांच्या पक्षातही किंमत नाही’; माजी खा. आढळराव पाटलांचा ‘हल्लाबोल’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथून चाकण-शिक्रापूर रोडवरुन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून (एमएच 14 एचयु 2075) देशी व विदेशी दारुची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास सापळा रचून वाहन आडवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता 67 हजार 760 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या आढळून आल्या. कोरोना नियमांचे उल्लंघन करुन अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनासह दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 5 लाख 48 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ऑक्टोंबरपासून बिग बॉसचा 15 सिझन, यंदा ‘कपल शो’ची शक्यता; ‘भाईजान’ सलमाननं हिरवा कंदिल दाखविल्यानंतर कलाकारांचा शोध सुरु

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, नितीन लोंढे, भगवंता मुठे, नामदेव राठोड, मारुती करचुंडे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

 

पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; पोलीस निरीक्षकासह 4 जणांवर CID कडून FIR

ब्लॅक फंगसच्या संकटादरम्यान दिलासादायक बातमी ! 10 लाख Amphotericin इंजेक्शन देणार ‘ही’ अमेरिकन कंपनी