पिंपरी : शहरातील महिला अत्याचाराचे पडसाद सर्वसाधारण सभेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. मात्र शहरातील गुन्हेगारी आणि महिला सुरक्षित आजही नाहीत..शहरातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. मुली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांची हप्तेखोरी वाढली आहे. तक्रारदारांना न्याय देण्याचे सोडून त्यांच्यावरच कायद्याचा दंडुका उगारला जातो, अशा संतप्त शब्दात सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय नगरसेकानी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज (गुरुवारी) सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठवत सभा तहकूब केली.

पिंपरीतून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षीय धनश्री गोपाळ पुणेकर या मुलीचा आज (गुरुवारी) एच. ए मैदानावर मृतदेह सापडला. या घटनेचे पडसाद महापालिका सभेत उमटले. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच हिंजवडी, कासारसाई येथील ऊस तोड कामगाराच्या 12 वर्षीय मुलीचा सामूहिक बलात्कारानंतर झालेला मृत्यू, विनयभंग प्रकरणात पीडित तरुणीची फिर्याद दाखल करून घेण्यास हिंजवडी पोलिसांनी केलेली टाळाटाळ या घटनांचा परामर्श घेतला. त्या अल्पवयीन मुलींना श्रद्धांजली वाहण्याची तहकूब सूचना त्यांनी मांडली. त्याला आशा शेंडगे यांनी अनुमोदन दिले.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4d2b0f13-c25b-11e8-b148-8327592a77bf’]
शिवसेना नगरसेविका मीनल यादव म्हणाल्या, भाजप आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून आणण्यास मदत करू असे विधान दहीहंडी उत्सवात केले. तेव्हापासून राज्यातील महिलांना असुरक्षित वाटत आहे. गेल्या महिन्याभरापासून पिंपरी-चिंचवडमधील महिला, विद्यार्थीनींवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. महापालिकेने महिलांना स्वरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. पोस्को कायद्याची माहिती देण्यात यावी. महापालिकेने सर्व शाळांसह पालिका इमारतींमध्ये महिलांसाठी तक्रार पेटी ठेवावी. प्रत्येक प्रभागात महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

[amazon_link asins=’B07437YHXP,B07GLS2TRR’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ee29441-c25b-11e8-94f4-076813062ed7′]
शहरातील मुली, महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. बंदिस्त इमारतीतून दुचाकी, चारचाकी वाहने चोरीला जात आहेत. वाहनांची दिवसाढवळ्या तोडफोड केली जात आहे. विवाहितांचे मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महाविद्यालया बाहेर उभ्या राहणाऱ्या टोळक्याकडून विद्यार्थीनीची छेड काढली जाते. सीसीटीव्ही फुटेज देऊनही आरोपींना गजाआड करण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. घटनास्थळी जाण्यासाठी वाहने नाहीत, अशी दुरुत्तरे त्यांच्याकडून दिली जातात. स्वतंत्र पोलीस आयुक्तलय होऊनही पोलिसांचे रडगाणे कायम असल्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या.

गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू ; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
चर्चेअंती महापौर, सभेचे अध्यक्ष राहुल जाधव म्हणाले, महिला, तरुणींना शहरात सुरक्षित वातावरणात फिरता आले पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करणे अपेक्षित आहे. त्यासाठी लवकरच पोलीस आयुक्त, गटनेते, ज्येष्ठ नगरसेविका यांची बैठक घेण्यात येईल. यानंतर सभा कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केली.