पिंपरी : भरदिवसा चौकात व्यापाऱ्याकडील 40 तोळ्यांचे दागिने लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पंजाब येथून शहरात आलेल्या सराफ व्यापाऱ्याच्या पाळतीवर राहून चोरट्यानी त्यांना लुटले. वर्दळीच्या चौकात, भर सकाळी त्यांच्याकडील बॅग हिसका मारून नेली. या बॅग मध्ये सहा लाख ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन लाख ८० हजार रुपये रोख रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पिंपरी चौकातील पूजा मेडिकल समोर घडली.

या प्रकरणी रवी अभिचंद मेहता (७१, रा. पंजाब) यांनी फिर्याद दिली असून दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये व्यापारी किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेहता हे सोन्याचे आणि चांदीचे दागिने परराज्यात नेऊन विकतात. पिंपरी-चिंचवड शहरात रात्री मुक्कामी आले होते. सकाळी दहाच्या सुमारास ते त्यांच्या ग्राहकांकडे निघाले होते. पूजा मेडिकल समोर आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्यापैकी एकाने त्यांच्या हातातील बॅग हिसकावली.

या बॅग मध्ये २ लाख ८० रोख रक्कम आणि ४० तोळे सोन्याचे (मिक्स) दागिने होते. मेहता यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते काही अंतरावर फरफटत गेले. यात त्यांच्या हाताला मुका मार लागला आहे. पिंपरी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/