महापौरपदाचे उमेदवार जाधव महात्मा फुलेंच्या वेशात पत्नी सावित्रीबाईच्या वेशात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  दरम्यान भारतीय जनता पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार राहूल जाधव हे महात्मा फुले यांच्या वेशात तर त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात महानगरपालिकेत आले आहेत.

पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून कुणबी म्हणून निवडून आलेले च-होलीचे नगरसेवक नितीन काळजे यांना भाजपचे पहिले महापौर होण्याची संधी मिळाली. सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. तर यावेळी उपमहापौर शैलजा मोरे यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर दुस-या सव्वा वर्षाचे महापौरपद मिळण्यासाठी सत्ताधारी पक्षातील ‘ओबीसी’ नगरेसवकांनी ताकद पणाला लावली होती.
[amazon_link asins=’B01I57XLNW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a948f5cb-97ac-11e8-8c24-efa1309c08b7′]

आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक राहुल जाधव, चिंचवड मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नामदेव ढाके यांच्यात महापौरपदासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती.  पक्षाने लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव यांना महापौरपदाची उमेदवारी देण्याचे ठरवले. त्यानुसार ३१ जुलै रोजी भाजपने महापौर पदासाठी राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी सचिन चिंचवडे यांचे अर्ज भरले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी विनोद नढे तर उपमहापौरपदासाठी विनया तापकीर यांचे अर्ज भरले. त्यानुसार आज शनिवारी महासभेत निवडणूक होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी राहूल जाधव