पिंपरी : महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौरपदी सचिन चिंचवडे निश्चित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी सुरुवात झाली आहे. इच्छुकांना आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. सत्ताधारी पक्षाकडून महापौरपदासाठी आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी अर्ज भरले आहेत.
[amazon_link asins=’B077WY86ZT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’323f3ca9-94b0-11e8-823a-5360bb650a40′]
पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गातून कुणबी म्हणून निवडून आलेले च-होलीचे नगरसेवक नितीन काळजे यांची महापौरपदावर वर्णी लागली होती. सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुस-या सव्वा वर्षाचे महापौरपद मिळण्यासाठी सत्ताधारी पक्षातील ‘ओबीसी’ नगरेसवकांनी ताकद पणाला लावली आहे.

आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक नगरसेवक राहुल जाधव, चिंचवड मतदार संघातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नामदेव ढाके यांच्यात महापौरपदासाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती. स्थायी समिती अध्यक्षपद आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या नगरसेविका गायकवाड यांच्याकडे आहे. तर सभागृह नेतेपद निष्ठावान गटाकडे आहे.  महापौर, उपमहापौर पदासाठी शनिवारी चार ऑगस्ट रोजी मतदान होऊन निश्चित होणार आहे. मात्र महापालिकेतील नगरसेवकांचे संख्या पाहता महापौरपदी राहुल जाधव आणि उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड होणार हे निश्चित आहे.