पिंपरी : डान्स टिचरनेच केला विनयभंग; नको तेथे अल्पवयीन मुलीला लावायला लावला हात

पिंपरी : पावडर मागण्याचा बहाणा करुन डान्स टिचरने अल्पवयीन मुलीला बाथरुममध्ये बालावून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या मुलीचा हात पकडून तिला आपल्या प्रायव्हेट पार्टला हात लावायला लावून लज्जास्पद कृत्य केले. हिंजवडी पोलिसांनी संदीप जगदीश परदेशी (वय ४०, रा. गणपती मंदिराजवळ , वारजे माळवाडी) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली असून हा प्रकार बुधवारी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या घरी घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्याकडे त्यांच्या गावाकडील एक मुलगी आली आहे. संदीप परदेशी हा डान्स टिचर आहे. तो काल त्यांच्या घरी आला होता. रात्री तो फिर्यादीच्या मुलीच्या बाथरुममध्ये गेला. त्याने बाथरुमचा दरवाजा अर्धा उघडा ठेवून ड्रर्मीकुल पावडरचा मागण्याचा बहाणा केला. पावडर देण्यासाठी गावाकडील मुलगी तेथे गेली असताना त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत तिचा हात पकडून तो आपल्या प्रायव्हेट पार्टला लावला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.