वडिलांचा मित्र असल्याचे सांगून लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, चल आपण फिरायला जाऊ’ असे म्हणून २८ वर्षीय तरुणाने १२ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला.

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. तर शंकर उर्फ पांडुरंग सूर्यवंशी (२८, रा. काळेवाडी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पीडित मुलगी पिंपरी येथील तिच्या शाळेत आली होती. शाळेच्या गेटवर शंकर तिला भेटला.

मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, आपण फिरायला जाऊ असे म्हणून त्याने तिचा विश्वास निर्माण केला.
तिला देहूरोड येथील एका डोंगरावर नेले. तिथे तिच्यासोबत त्याने लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि पालिसांनी आरोपीला अटक केली.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/