पिंपरीत मोटारीचा अपघात १ ठार; एक गंभीर

पोलीसनामा
पिंपरी-चिंचवड च्या मोरवाडी येथील ग्रेड सेपरेटर मध्ये मोटारीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.शुभम जाधव वय-२० अस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे,तर ऋषिकेश पवार अस जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,एम.एच-०४ इ.डी- ८४६१ ही मोटार मुंबई वरून पुण्याच्या दिशेने जात होती.भरधाव वेगात असलेली मोटार ग्रेडसेपरेटर मधील दुभाजकवरील खांबाला धडकल्याने भीषण अपघात झाला.यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शुभम जाधव वय-२० अस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.तर ऋषिकेश पवार हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.अपघात एवढा भीषण होता की गाडीचा समोरील भाग पूर्ण चक्का चुर झाला आहे. ही घटना आज पहाटे पाच च्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे.