पिंपरी : अनैतिक संबंधातून तळवडे येथे एकाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून एकाचा खून करण्यात आला आहे. हा प्रकार तळवडे, गणेशनगर येथील मोकळ्या मैदानात आज बुधवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडला.

उमेश पवार (रा. टी ओठा स्कीम, निगडी) याचा खून झाला आहे. तर अनिल बबन धायगुडे (३३, रा. ज्योतिबा मंगल कार्यालयाचे बाजूला, तळवडे, रुपीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश आणि अनिल हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र उमेशचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय अनिल याला होता. याच रागातून आज सायंकाळी हॉटेल आमंत्रण जवळ, त्रिवेणी नगर ते तळवडे रोड मोकळे मैदान दरम्यान हा प्रकार घडला. उमेश पवार याचे डोक्यात सिमेंट ब्लॉक मारून त्यास जिवे ठार मारले. तपास चिखली पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/