Pimpri Murder Case | पिंपरी : प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तरुणाचा खून, एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Murder Case | मुलीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) असल्याच्या संशयावरुन चार जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.21) सायंकाळी साडे पाच ते सात या दरम्यान दत्तननगर, चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.(Pimpri Murder Case)

सुरेश लोडबा ढेंबरे (वय-21 रा. दत्तनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष चौघुले (वय 25, रा. चिंचवड), दोन महिला आणि संतोष याचा एक मित्र यांच्या विरोधात आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संतोष चौगुले याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश ठोंबरे फिर्यादी यांचा दीर आहे. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून आरोपींनी सुरेश याला लाथाबुक्क्यांनी व कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. त्यात सुरेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे रुपाली बोबडे करीत आहेत.

चालकाला मारहाण करुन लुटले

निगडी : टेम्पो चालकाला मारहाण करुन लुटल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police) दोघांवर गुन्हा दाखल
करुन एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.20) रात्री आठच्या सुमारास भक्ती शक्ती पुलाच्या खाली घडली.
याबाबत रमेश बबन सुळे (वय-39 रा. रुपीनगर, तळवडे) यांन निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर शब्बीर अत्तर सय्यद (वय-27 रा. ओटास्कीम, निगडी) याला अटक केली आहे.
फिर्यादी हे त्यांचा पार्क केलेला टेम्पो घेण्यासाठी गेले. त्यावेळी रिक्षामध्ये आरोपी बसले होते.
त्यांनी फिर्यादी यांना मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल
चोरुन नेला. याबाबत तक्रार देताच पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार फरार झाला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार