कोयत्याने वार करुन जीम ट्रेनरचा खून, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – रिक्षाची तोडफोड केली म्हणून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खून केल्याची घटना चिंचवड येथील चिंचवडेनगर येथे शुक्रवारी घडली. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. प्रेम सायबु लिंगदाळे (21, रा. काकडे पार्क, चिंचवड) याचा खून केला आहे.

आनंद अजिनाथ साठे (27, रा.चिंचवडेनगर वृंदावन कॉलनी चिंचवड, दीपक शरद कोल्हे (29, रा. बिजली कॉलनी कॉलनी चिंचवड) आणि किरण बाबासाहेब चव्हाण (21, रा. वृंदावन कॉलनी चिंचवड नगर) या तिघांना अटक केली आहे. मॅडी माडीवाल, राकेश सूर्यवंशी, गणेश खांगटे, गणेश कांबळे, योगेश फुरडे, सागर परीट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिवानंद शंकर हेळवे (23, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम आणि शिवानंद या दोघांनी मॅडी माडीवाल याच्या रिक्षाची तोडफोड केली होती. याचा राग मनात धरुन शुक्रवारी बाराच्या सुमारास या टोळक्याने प्रेम याच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये प्रेम याचा मृत्यू झाला. तपास चिंचवड पोलीस करत आहेत.