पिंपरी : थेरगाव घाटावर तरुणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत थेरगाव येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. हा प्रकार आज शुक्रवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडला असून खूनाचे नेमके कारण समजले नाही.

हृषीकेश बालाजी गायकवाड (३०, रा. थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हृषीकेश याच्या डोक्यात तसेच इतरत्र दगडाने मारहाण करण्यात आलेली आहे. यामध्ये तो रक्तबंबाळ झाला आहे. नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन हृषीकेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वाकड पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like