पिंपरी : पत्नीच्या प्रियकराचा कोयत्याने सपासप वार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नापूर्वी पत्नीचे प्रेम संबध असलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. ही घटना रविवारी जिल्हा औंध रुग्णालयात घडली. सौरभ व्यंकट जाधव (28, रा. संजयनगर, औंध) याचा खून झाला आहे. तर आयाज शेख, सोन्या बराथे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सौरभच्या भावाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; आयाज याची पत्नी आणि सौरभ यांचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. यातून आयाज आणि त्याचा मित्र सोन्या या दोघांनी सौरभ याला जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणून तेथे त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. तपास सांगवी पोलीस करत आहेत.