निर्दयी : सासूच्या दशक्रिया विधीला घरातील गेले होते सगळे, आईनं 4 वर्षाच्या चिमुकलीचं डोक भिंतीवर आपटून अन् गळा आवळून केला खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सासूच्या दशक्रिया विधीला घरातील गेले असताना खेळत असताना ऐकले नाही म्हणून डोके भिंतीवर आपटून, गळा आवळून चार वर्षीय चिमुकलीचा आईने खून केला. ही घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवीत घडली आहे. या प्रकरणी आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
रिया दीपक काकडे (4) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर सविता दीपक काकडे (22) असे आरोपी आईचे नाव आहे.

घरात सहा महिण्याचा मुलगा, आई आणि चार वर्षीय चिमुकली होती. तेव्हा ही हृदयद्रावक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात सासू, सासरे, दोन मुलं, पती हे सर्व जण राहतात. मात्र, सासूचा मृत्यू झाल्याने त्यांचा दश क्रियाविधी असल्याने आज सर्वजण बाहेरगावी गेले होते. घरात सहा महिन्यांचा चिमुकला, चार वर्षांची चिमुकली होती.

दरम्यान सकाळी ही चिमुकली त्रास देत असल्याने आई सविताने तिचा खून केला. या मुलीचं डोकं भिंतीवर आदळलं असणयाची शक्यात वर्तवली जात असून, तिच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण देखील आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, आरोपी सविता यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेचा अधिक तपास सांगवी पोलीस करत आहेत.