पिंपरी : गळा आवळून पत्नीचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – आठ महिन्यापूर्वी चिंचवड येथे राहायला आलेल्या ‘टेलर’ने घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना आज शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास घडली. चिंचवड पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

बानू हसनसहाब नदाम (३४, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) या महिलेचा खून झाला असून पती हसनसाहब दस्तगिर नदाफ (४१, रा. चिंचवड) याला अटक केली आहे. नदाफ हा मूळचा कर्नाटक, गुलबर्गा येथील आहे. तो आठ महिन्यांपूर्वी चिंचवडनगर येथे राहण्यास आला आहे. तो कपडे शिलाई करण्याचे काम करतो. त्याने आठ महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. यातून त्याच्यात आणि पत्नी बानू मध्ये वाद होत होते. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्याने शुक्रवारी पहाटे राहते घरात ओढणीच्या सहाय्याने पत्नी बानूचा गळा आवळून खून केला. पहिल्या पत्नीच्या तीन मुली आहेत. तपास चिंचवड पोलीस करत आहेत.