पिंपरी : चिंचवडमध्ये किरकोळ कारणावरुन तरूणाचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड, लिंक रोडवरील पत्राशेड येथे मित्राला मारहाण केल्याच्या कारणावरून आठ जणांच्या टोळक्‍याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन खून केला. ही घटना बुधवारी (दि. 8) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

करण महादेव पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक संजय गायकवाड (19, रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. 8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आबाशा ऊर्फ पृथ्वीराज कांबळे, आदित्य भोसले आणि त्याचे सहा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी अभिषेक गायकवाड हे आपले मित्रांसोबत पत्राशेड परिसरात गप्पा मारत होते. त्यांचा मित्र करण पवार हा त्यांच्याकडे गप्पा मारण्यासाठी येत होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी “तू अमर चव्हाणच्या मित्राला मारतोस काय, आज तुला जिवंत सोडणार नाही, आज तुला मारूनच टाकतो,’ असे म्हणत आरोपींनी करण पवार याच्यावर कोयता, लोखंडी रॉड, दगड आणि काचेच्या बाटलीने हल्ला केला. शनिवारी उपचारादरम्यान करण पवार याचा मृत्यू झाला. तपास पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like