पिंपरीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘तुफान’ राडा, माजी उपमहापौरांसह दोन जखमी

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यात सुरुवात झाली असून काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्धभवले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. जखमी झालेले शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे समजतेय. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही माराहण झाल्याचे समजतेय. या प्रकरणात अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये तणावाचे वातावरण आहे. हा प्रकार पिंपरी कॅम्प परिसरात घडला.

पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आज सकाळपासून बोगस मतदान होत असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान, शिवसेनेचे काही कार्य़कर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, डब्बू आसवानी यांनी प्रसंगावधान ओळखून तेथून पळून गेले. त्यानंतर त्यांच्या घरासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. त्यांच्यामध्ये हाणामारी झाली यामध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पिंपरी पोलीस चौकीमध्ये जमा झाले होते. याठिकाणी तणावाचे वातावरण झाल्याने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसेनेच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Visit  :Policenama.com