पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांच्या फेरबदलाची ‘गरज’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन (अमोल येलमार) – शहरातील वाढती गुन्हेगारी, गुन्हे उघडकीस आणण्यात येत असलेले अपयश, कामात मरगळता, वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा, बोकाळलेली अवैद्य वाहतूक व्यवस्था हद्दीत असणारे काही पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. यामुळे पोलीस यंत्रणा नक्की काय करायचे अश्या मानसिकतेतून जात आहे. पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेत फेरबदल करण्याची आवश्यकता सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील भाग कमी करुन स्वतंत्र पिंपरी चिंचवड आयुक्तालय निर्माण झाले. सोळा महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या आयुक्तालयास आजही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हे जरी खरे असले तरी पूर्वी याही पेक्षा कमी मनुष्यबळात काम सुरळीत होत होते तेही तितकेच खरे आहे. आयुक्तालय झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी वेगवेगळ्या मोहीम राबवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चांगले प्रयत्न केले गेले.

आजही पोलीस आयुक्तालयात चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता भासवत आहे. मात्र काही ठिकाणी अकार्यक्षम अधिकाऱ्यांची वर्णी लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढत आहे, दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचा तपास लागत नाही, वरिष्ठांना दाखवण्यासाठी कागदोपत्री कारवाई केलेले गुन्हेगार मोकाट फिरत असून त्यांचा उपद्रव्य वाढत आहे.

पोलीस ठाण्याप्रमाणेच गुन्हे शाखेतही काही युनिट थंड आहेत. त्यांच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे होत आहेत, मात्र गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नेहमी प्रमाणे पसार होण्यात यशस्वी होत आहेत. हद्दीतील गुन्हेगारांवर पाहिजे असणारी ‘खाकीची वचक’ दिसत नाही. पोलीस आयुक्तांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या. काही महिने सर्व सुरळीत चालू राहिले, मात्र सध्या वाहतूक व्यवस्थेचा खेळ खंडोबा झालेला आहे. याही ठिकाणी चांगले प्रयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची संख्या जेमतेम आहे ही वस्तुस्थिती असली तरी आयुक्तालय, पोलीस ठाणे सुरळीत चालू राहायचे असेल तर फेरबदल करण्याची नितांत गरज भासत आहे.

सिनियर ज्युनियर वाद कायम…
आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरुन पहिल्यापासूनच वाद आहे. यामध्ये काही ठिकाणी आम्हाला डावलून ज्युनियर अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सिनियर अधिकारी आणि ज्युनियर अधिकारी वाद हा आजही कायमच आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/