Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरातील दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई

निगडी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, बलात्कार, अपहरण, वाहनांची तोडफोड, अपहरण करुन खंडणी उकळणे यासारखे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख पिंटु अनिरुद्ध जाधव याच्यासह 3 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर दुसरी कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश उर्फ जिलब्या यादव गायकवाड याच्यासह 14 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि टोळीचा प्रमुख आरोपी आकाश उर्फ जिलब्या यादव गायकवाड (वय-23 रा. मोहननगर, चिंचवड), आशिष देवीदास गोरखा (वय-24), घनशाम बाळु साळुंखे (वय-22), आशिष राजू कांबळे (वय-20), कमलेश उर्फ सोन्या उर्फ सुबोध दत्तात्रय ढवळे (वय-23), अरविंद उर्फ सोन्या रमेश काळे (वय-20), दिपक राजकुमार गिरी (वय-26), युवराज रमेश काळे (वय-23), ऋषीकेश संतोष शिंदे (वय-20), बाळासाहेब उर्फ मनोज शांताराम गवळी (वय-37), रोहीत मनोज देशमुख (वय-20), अक्षय अजिनाथ लोंढे (वय-24) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ जिलब्या यादव गायकवाड आणि इतर आरोपी हे वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून वैयक्तीतरित्या अथवा संघटितपणे खुनाचा प्रयत्न, घरफोडी करणे, गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी उकळणे, वाहनांची तोडफोड करणे, सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करणे असे एकूण 15 गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहरात दाखल आहेत. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दितील सराईत गुन्हेगार आणि टोळीचा प्रमुख पिंटु अनिरुद्ध जाधव याच्यासह जावेद गुलाब पठाण (वय-24), सलीम मोमीन शेख (वय-21) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, अपहरण करुन खंडणी उकळणे, खंडणी मागणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. पांचाळ, गणेश लोंढे, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, विजय पारधी, अनिल गायकवाड, पोलीस शिपाई ओंकार बंड, पिंपरी पोलीस ठाणे आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली.