Pimpri News | अविनाश चिलेकर यांची ‘डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र’च्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri News | डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघटनेच्या (Digital Media Editors and Journalists Association) पुणे जिल्हा (Pune) अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर (Avinash Chilekar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची निवड बुधवारी (दि.7) करण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तर सरचिटणीस नंदकुमार सुतार (Nandkumar Sutar) यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

यावेळी नऱ्हे येथील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला सारंग कामतेकर, अतुल दीक्षित, अक्षय दीक्षित, भगवान माने, अजिंक्य स्वामी, पराग जवळेकर, सागर किन्नरी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजा माने (Raja Mane) म्हणाले, आज डिजिटल मीडिया ग्रामीण पातळीवर पोहचला आहे. त्यामुळे आपल्याला देखील गाव पातळीवर पोहचून मजबूत संघटना कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. तसेच प्रक्षोक्षक व भडकाऊ बातम्यांना संघटनेच्या माध्यमातून प्रतिबंध घालून चांगल्या बातम्या वाचकांपर्यंत कसे पोहचवता येईल हे पाहिले पाहिजे.

संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी

1. नंदकुमार सुतार – सरचिटणीस, महाराष्ट्र
2. अविनाश चिलेकर – अध्यक्ष, पुणे जिल्हा
3. तुकाराम गोडसे – उपाध्यक्ष पुणे जिल्हा
4. शामल खैरनार – अध्यक्ष, पुणे शहर
5. महेश कुगावकर – सचिव, पुणे शहर
6. केतन महामुनी – सहसचिव, महाराष्ट्र
7. अमोल पाटील – सहसचिव, पुणे जिल्हा
8. अ‍ॅड. अतुल पाटील – कायदेशीर सल्लागार, महाराष्ट्र

हे देखील वाचा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pimpri News | Appointment of Avinash Chilekar as Pune District President of ‘Digital Media Editors Press Association Maharashtra’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update