Pimpri News | सिगारेट आणण्यास नकार दिल्याने टोळक्याचा तरुणाला कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri News| घरी जात असलेल्या तरुणाला सिगारेट आणण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला. या कारणावरुन टोळक्याने तरुणावर कोयते, चाकू, दगडाने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणात पिंपरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. Pimpri News | attempt to murder news

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

उमेश संभाजी पवार, अमोल संभाजी पवार, गोपल्या दांडे, बाळ्या ऊर्फ कृष्णा शिवाजी वारभवन, व्यंकटेश म्हेत्रे (सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच त्यांच्या ३ ते ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सतिश देविदास शिंगाडे (वय २२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी चिंचवड) याने फिर्याद दिली आहे. ही घटना चिंचवडमधील इंदिरा गांधी झोपडपट्टीत २२ जून रोजी रात्री साडेआठ वाजता घडली.सतिश शिंगाडे हा त्याचा मित्र आक्रम खान याचा वाढदिवस साजरा करुन घरी चालला होता. यावेळी रस्त्याच्या कडेला घोळका करुन आरोपी थांबलेले होते.

त्यातील अमोल पवार याने सतिश शिंगाडे याला मारुन टपरीवरुन सिगारेट घेऊन येण्यास सांगितले. त्यावर त्याने मी आता घरी चाललो आहे. तु दुसर्‍या कोणाला तरी सांग असे सांगितले. त्याचा राग येऊन अमोल याने त्याच्या गालावर चापट मारली. त्याचा जाब सतिश याने विचारल्यावर या टोळक्याने शिवीगाळ करुन हातातील कोयते, चाकू व दगडाने फिर्यादीच्या डोक्यात, पोटावर व अंगावर ठिकठिकाणी मारुन जबर जखमी केले. पिंपरी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन ५ जणांना अटक केली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Pimpri News | attempt to murder news

हे देखील वाचा

Pune Crime News | मोक्क्यातील सराईत गुन्हेगार विवेक शेवाळे गजाआड

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास