Pimpri News । पिंपरीत आणखी एका तरुणाला अटक; 4 हजारांचा 176 ग्रॅम गांजा जप्त

पिंपरी न्यूज ( Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – नागरिकांमध्ये अंमली पदार्थ सेवन करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून त्यात तरुणाई आयुष्याची वाट हरवत चालली आहे. मोठ-मोठ्या शहरात आणि ग्रामीण भागात देखील व्यसनाधीनता फोफावली आहे. तशीच पिंपरी – चिंचवडमध्ये (Pimpri- Chinchwad) देखील दररोज गांजा विक्रीच्या घटना घडू लागल्या आहेत. सोमवारी (21 जून) रोजी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला अटक केलीय. त्या तरुणांकडून 4 हजार 400 रुपये किमतीचा 176 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. भोसरी येथे अंकुशराव लांडगे सभागृह परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सनी बबन शिंदे (वय 27, रा. भोसरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सनी शिंदे या तरुणाकडे गांजा असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या जवळ असणारा 4 हजार 400 रुपये किमतीचा 176 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस हवालदार बाळू कोकाटे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.

दरम्यान, रविवारी (20 जून) रोजी अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आले होते. आरोपीकडून तब्बल 42 हजार 900 रुपये किमतीचा एक किलो 716 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणावरून दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये युवक वर्ग यामध्ये अडकू लागला आहे. लोकांनी सतर्क राहून अशा घटना पोलिसांना तात्काळ कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो. असं पोलिसांनी आवाहन केलं आहे.

हे देखील वाचा

Pune Accident News | भरधाव टेम्पोच्या धडकेने ज्येष्ठ नागरिक जागीच ठार

CBI in Mumbai High Court । तपास फक्त अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही; सीबीआयने दिली हायकोर्टाला माहिती

Pune Crime News | पुण्यात तलवारीच्या धाकाने भाजी विक्रेत्याला लुटले, कोंढव्यातील घटना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pimpri news | cannabis sales pimpri another youth arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update