Pimpri News | पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना बजावलं, म्हणाले – ’20 जुलैपर्यंत लस घ्या अन्यथा पगार मिळणार नाही’

पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pimpri News | कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची पगार थकीत करण्याचा कठोर निर्णय पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील (Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Rajesh Patil) यांनी घेतला आहे. लसीचे दोन्ही डोस न घेतलेल्या आधिकाऱ्यांचा जुलै महिन्यातील पगार रोखण्यात येईल, असा इशाराच आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे. आयुक्तांनी लस घेण्यासाठी 20 जुलैची डेडलाइन दिली आहे. Pimpri News | coronavirus vaccine salary withheld rajesh patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेसह मानधनावरील अधिकारी व कर्मचारी (Staff) आणि ठेकेदारांच्याही कामगारांना 20 जुलैपर्यंत लसीचे दोन्ही डोस घेण्याबाबत बजावलं आहे. अन्यथा जुलै महिन्याचा पगार रोखला जाईल असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला आहे. 31 मार्च रोजी लसीकरण करुन घ्यावे असा पहिला आदेश आयुक्त पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. त्यानंतर 6 मे रोजी दुसरा आदेश काढला होता. मात्र, त्यानंतरही बहूतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच आयुक्ताी कठोर निर्णय घेतला आहे. आपापल्या खात्यात लसीकरण करुन घेण्याची जबाबदारी सबंधित विभागप्रमुखांवर आय़ुक्तांनी टाकली आहे. 20 जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचा पगार स्थगित ठेवण्याचा मानस आयुक्तांनी बोलून दाखवला आहे.

Web Title :- Pimpri News | coronavirus vaccine salary withheld rajesh patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी