Pimpri News : ‘या’ कारणामुळे पिंपरीच्या पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन, पोलीस दलात खळबळ

पिंपरी : पिपंरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्याचे कलम कमी केल्याने आरोपीला जामीन मिळण्यास मदत झाली तसेच तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी रात्री उशिरा आदेश दिले.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे आणि पोलीस उपनिरीक्षक एस.एस.जाधव असे निलंबित केलेल्या पोलीस अधिकार्‍यांची नावे आहेत. एका गंभीर गुन्ह्यात आरोपींवर लावण्यात आलेले दरोड्याचे कलम कमी करण्याबाबतचा लेखी अहवाल उपनिरीक्षक जाधव व पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी न्यायालयात सादर केला होता.त्यामुळे या प्रकरणातही आरोपींना जामीन मिळाला. आरोपींना जामीन मिळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.