Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या 9 जणांवर FIR

पिंपरी/पोलीसनामा ऑनलाइन : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेकडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटीस पाठवून अधिकृत बांधकाम काढण्यास सांगण्यात आले आहे. नोटीस देऊनदेखील अनधिकृत बांधकाम न काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. आता आणखी नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस ठाण्यात 4, पिंपरी 3 तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात चंद्रकांत आनंदराव कदम (रा. वल्लभनगर) यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर अशोक आणि ओमप्रकाश अशोक मिश्रा (रा. कमला क्रॉस रोड, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राजेंद्र वसंतराव डुंबरे यांनी फिर्याद दिली आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नईम पीर मोहम्मद, ज्योती तुकाराम डुंबरे, धोंडीराम लक्ष्मण वंजारे आणि कारभारी गुलाबराव पुंडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता हेमंद प्रभाकर देसाई (वय 47) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोंडीराम माधव नगावणे (वय 55, रा. मोशी), नितीन आबाजी जाधव या दोघांवर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपअभियंता हेमंद प्रभाकर देसाई (वय 47) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.