Pimpri News : मोशीत तरुणाचा खुन करुन मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

पिंपरी : तरुणावर वार करुन त्याचा खुन केल्यानंतर त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊन जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मोशी प्राधिकरणातील सेक्टर नंबर ११ येथील पंडीत दिनदयाह उपाध्याय रोडच्या डाव्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात घडली आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमरदीप पुजारी यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
या प्रकरणातील तरुणाचे वय ३० ते ४० वर्षाचे असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांना मोशी प्राधिकरणातील मोकळ्या मैदानात जळालेलया अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. कोणी तरी या तरुणाचा खुन करुन त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याच्या अंगावर पेट्रोल अथवा अन्य ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक एस़ एस़ पांचाळ अधिक तपास करीत आहेत.