Pimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात जोरदार मोहिम; दोन दिवसात 8 जणांना पकडले

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अंमली पदार्थाविरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) जोरदार मोहिम सुरु केली आहे. गेल्या २ दिवसात पोलिसांनी एकूण ८ जणांना पकडून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गांजा हस्तगत केला आहे. Pimpri Chinchwad police cracks down on drugs; Caught 8 people in two days

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

निगडी पोलिसांनी (Nigdi Police) आकुर्डीतील विठ्ठलवाडीमधील नविन तरटे चाळातील छापा घातला. निलेश नंदेश्वर चव्हाण (वय २५) याला अटक (Arrest) करुन त्याच्या घरातून ३५ हजार ७५० रुपयांचा १ किलो २९८ ग्रॅम गांजा (Hemp) जप्त केला आहे. अहमद रजा वाशीउज्जाम खान (वय ३४, रा. मोहमदाबाद, गाजीपूर, उत्तरप्रदेश) हा निगडी ओळा स्कीम येथील पेरुच्या बागेत संशयास्पदरित्या थांबला होता. त्याची झडती घेतली असताना त्याच्याकडे ५ हजार ५५० रुपयांचा २२ ग्रॅम गांजा आढळून आला. निगडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दिगंबर रघुनाथ चौधरी (वय ६२, रा. गोलेगाव ता. खेड) यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याचे घरात पोलिसांना ४८ हजार रुपयांचा गांजा आढळून आला आहे. विक्री करण्याच्या उद्देशाने गांजा बाळगल्याने आळंदी पोलिसांनी (Alandi Police) दिगंबर चौधरी यांना अटक केली आहे.

राजेभाऊ शेषराव खंडागळे (वय ५२, रा. भोसरी पुलाखाली, मुळ गाव माजलगाव, जि. बीड) हे दुचाकी घेऊन भोसरी येथील पीएमपी बसस्टॉपजवळ थांबले होते. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या दुचाकीची झडती घेतली असता २१ हजार ८०० रुपयांचा ८८२ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी राजेभाऊ खंडागळे याला अटक केली आहे. सोमवारी व मंगळवारी पिपंरी चिंचवड पोलिसांनी चार जणांना अटक करुन त्यांच्याकडून गांजा जप्त केला होता.

Web Title :- Pimpri News | Pimpri Chinchwad police cracks down on drugs; Caught 8 people in two days

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील खळबळजनक घटना ! तपासासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांवर जमावाचा प्राणघातक हल्ला; पुण्यात दीडशे जणांवर FIR दाखल

Pune Crime News | शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्यास पुण्यात अटक

राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे संकट; 21 रुग्ण आढळले; मुंबईकरांना मात्र दिलासा !

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आज काय करणार ‘नवीन घोषणा’ ! आजच्या AGM मध्ये 5जी ची घोषणेचा कयास