Pimpri News | पिंपरीत सलग तिसर्‍या दिवशी 1 लाखांचा गांजा जप्त, 5 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri News | पिंपरी चिंचवड पोलिसांनी डग्ज फ्री पिंपरी चिंचवड मोहीम सुरु केली असून सलग तिसर्‍या दिवशी अंमली पदार्थ बाळगणार्‍यांविरुद्ध कारवाई केली आहे. पाच जणांना पकडून त्यांच्याकडून १ लाख ४ हजार रुपयांचा २ किलो २४६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
मुंबई बंगलुरु महामार्गावरील बावधन पुलाचे बाजूला हिंजवडीकडे जाणार्‍या सर्व्हिस रोडवर हरुन बाबु खान (वय ३२, रा. बावधन) हा संशयास्पदरित्या दुचाकीसह थांबला होता. त्याची पोलिसांनी झडती घेतल्यावर त्याच्याकडे ५३४ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी दुचाकीसह ५८ हजार ६५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

दापोडी येथील पीडब्ल्यु डी कॉलनीत रोहन उत्तम कांबळे (वय १९, रा. दापोडी) याच्या ताब्यातून २४ हजार ८०० रुपयांचा ८६५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी येथील ननावरे वस्तीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांकडून २० हजार ६७५ रुपयांचा ८२७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. शिवशंकर अंबिकाप्रसाद यादव (वय १८), रामरक्षा धर्मराज पासवान (वय ३६, दोघे रा. ननावरे वस्ती, सुस रोड, सुसगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.

वेदांत सतिश शेलार (वय २०, रा. केशवनगर, चिंचवड गाव) हा दुचाकीवरुन चिंचवड येथील काकडे पार्क येथे आला असताना पोलिसांनी संशयावरुन त्याला पकडले.
त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४०० रुपयांचा ३० ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी त्याची दुचाकी, ५५० रुपये असा ५० हजार ९५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Titel : pimpri news | pimpri chinchwad police take big action on drug sellers, FIR on 5

हे देखील वाचा

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’