Pimpri News : लॉजवर चालणाऱ्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 7 महिलांची सुटका

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी आणि भोसरी येथील लॉजवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई नुकतीच करण्यात आली.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सिटी प्लाझा, कल्पना लॉज आणि भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावेरी लॉज येथे एकाच दिवशी छापाटाकून अवैधरित्या सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाच पर्दाफाश करुन 15 जणांविरोधात कारवाई केली. चिरजित देवाशीश सरकार (वय – 25 रा. सिटी हॉटेल, काळेवाडी), जय भिमबहाद्दूर विश्वकर्मा (वय-20), तिलक कर्ण थापा (वय-19), आकाश प्रदिप बिशी (वय-22), प्रविण जयसिंग गंगावणे (वय-60), अब्दुल हमीद (रा. मोरवाडी), बबलु प्रसाद, जयराम आणा गोड्डा, जयकुमार श्रीगणेश यादव (वय-25 रा. कल्पना लॉज, पिंपरी), अजितकुमार श्रीउतीन साव (वय-35), शांत पुजारी उर्फ छोटु, दिपक काटरीया (रा. पिंपरी), गोपाळ लिंबा पाटील (वय-25), समाधान प्रकाश वाघ (वय-26), हॉटेल चालक बाळाआण्णा शेट्टी (रा. हॉटेल कावेरी) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, भवारी, पोलीस हवालदार लोहकरे, म्हस्कर, जाधव, महिला पोलीस नाईक पुंडे यांच्या पथकाने केली.