Pimpri : पिस्तुल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

दिघी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   विनापरवाना पिस्टल व जिवंत काडतूस (Cartridge) जवळ बाळगल्याप्रकरणी (Carrying Pistol) एका 21 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दिघी येथील मॅग्झीन चौकात करण्यात आली.

प्रणव सुरेश कांबळे (वय-21 रा. सियरा झेरॉक्स शॉप जवळ, गुरुदेवनगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीने 30 हजार रुपये किंमतीचे विनापरवाना एक लोखंडी पिस्टल आणि 200 रुपये किंमतीचे जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार कारवाई करत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढिल तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे करीत आहेत.