Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

चिखली/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वैधानिक इशारा शासकीय नमुन्यात न छापलेल्या विदेशी कंपन्यांच्या महागड्या सिगारेटसह गुटख्याचा साठा सामाजिक सुरक्षा विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) चिखली येथील डायमंड पान स्टोअर्स आणि कुदळवाडी येथील एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुनाराम बोराराम सिरवी (वय-26 रा. साई भक्ती सोसायटी, शहुनगर, चिखली), नवनाथ मनोहर मोरे (वय-38 रा. मोरे वस्ती, अष्टविनायक चौक, चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक विष्णु गौतम भारती यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिखली येथील डायमंड पान स्टोअर्स मध्ये वैधानिक इशारा न छापलेल्या विदेशी कंपन्यांच्या सिगारेटची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. तसेच कुदळवाडी येथील भास्कर चौधरी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना गुटख्याचा साठा करुन त्याची विक्री होत असल्याची माहिती सामजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 23 हजार 630 रुपये रोख, 5 लाख 54 हजार 363 रुपयांचा विविध कंपनीचा गुटखा, 2 हजार 520 रुपये किमंतीची Gudang Garam व Djarum black सिगारेट, 30 रुपये किमतीचे दोन मोबाईल, 55 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 6 लाख 65 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हिंजवडीत विदेशी दारु जप्त

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हिंजवडीमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 2 लाख 69 हजार 532 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी 2 लाख 50 हजार रुपयांची कार, 8 हजार रुपयांचा मोबाइल, 11 हजार 532 रुपयांची विदेशी दारु व बिअर बॉटल जप्त केल्या. कुंडलिक ज्ञानोबा पारखी (वय-46 रा. गंगारामवाडी, माण, ता. मुळशी), भगवान भाऊ भोईर (वय-60 रा. भोईरवाडी, फेज 3 हिंजवडी) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई जालिंदर रामचंद्र गारे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहाय्यक पोलीस फौजदार विजय कांबळे, संदिप गवारी, पोलीस हवालदार अनंत यादव, सुनिल शिरसाठ, नितीन लोंढे, पोलीस नाईक नीतीन लोंढे, मारुती करचुंडे, भगवंता मुटे महेश बारकुले, दिपक साबळे, विष्णु भारती, अमोल शिंदे, अनिल महाजन, गमेश कारोटे, पोलीस शिपाई राजेश कोकाटे, मारोतराव जाधव, योगेश तिडके, महिला पोलीस नाईक वैष्णवी गावडे, महिला पोलीस शिपाई सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने केली.