Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri News | पहिला विवाह झाला असताना तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या फार्म हाऊसवर नेले. तेथे कपाळावर कुंकू लावून तू माझी बायको आहेस, असे सांगून जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध (Rape) ठेवणार्‍या तरुणावर देहुरोड पोलिसांनी (dehu road police station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

संदीप मनोहर शिंदे (वय ३७, रा. शिवाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार जुलै २०१७ पासून मार्च २०२१ पर्यंत सुरु होता. आरोपी शिंदे याने फिर्यादीला तू मला खूप आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुझ्यासोबत मैत्री करण्यास तयार आहे. तुझी इच्छा आहे का असे विचारुन विश्वास संपादन केला. फिर्यादीने मैत्री करण्यास होकार दिला.

त्यानंतर त्याने १५ डिसेंबर २०१७ रोजी मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून मुंबई -पुणे महामार्गावरील रावेत येथील हॉटेलमध्ये वॅगनर गाडीतून जेवण्यास घेऊन गेला.
जेवण झाल्यानंतर राजगुरुनगर ते खेड दरम्यान असलेल्या सौरभ कहाणे याच्या फार्म हाऊसवर नेले.
तेथे त्याने फिर्यादी यांच्या कपाळावर कुंकू लावून तू माझी बायको आहे, असे सांगून तिच्यावर बलात्कार केला.
त्याचे लग्न झालेले असताना ते लपवून ठेवून फिर्यादीवर वारंवार जबरदस्तीने नैसर्गिक व अनैसर्गिक संबंध ठेवले.
फिर्यादीचे यापूर्वीच लग्न झाले असल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

Web Titel : pimpri news | rape case registered in dehuraod police station

हे देखील वाचा

Rain Rest | राज्यात आगामी 2 दिवसासाठी हवामान विभागाकडून कोठेही अलर्ट नाही, पावसाची विश्रांती

Pimpri Chinchwad News | भोसरी पोलिसांकडून तिघांना अटक, पिस्तूलासह 4 काडतुसे हस्तगत

Earn Money | कमाईची संधी ! 23 जूनला 290 रूपये लावून तुम्ही बनू शकता लखपती! जाणून घ्या कुठे लावायचा आहे पैसा?

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा

कोरोना झाल्यानंतर एवढ्या दिवसांपर्यंत शरीरात राहतात अ‍ॅन्टीबॉडी, वैज्ञानिकांनी सांगितलं

‘या’ 5 मसाल्यांना मिसळून बनवा इम्युनिटी बुस्टर काढा, जाणून घ्या कधी अन् कसा प्यायचा