Pimpri News | धक्कादायक ! आयसीयुमधील बाळाला ऑक्सिजन कॉक बंद करून जीवे मारण्याचा प्रयत्न, डॉक्टर पिता-पुत्रासह तिघांवर FIR

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाइन – बाळावर आयसीयु (ICU) मध्ये उपचार सुरु असताना डॉक्टर व त्याचे नातेवाईक हॉंस्पिटलमध्ये येऊन त्यांनी आयसीयु (ICU) ला ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या पाईपचा कॉक बंद करुन बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन डॉक्टरांसह पुतण्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.
डॉ. रमेश सोनवणे, त्यांचा मुलगा व डॉ. भूषण सोनवणे व त्यांचा पुतण्या हर्षल सोनावणे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही घटना सोमाटणे फाटा येथील जीवन हॉस्पिटलमध्ये २२ जून २०२१ रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला होता.

याप्रकरणी दत्तात्रय एकनाथ वावरे (वय २८, रा. नायगाव, पो. कामशेत, ता. मावळ) या शेतकर्‍याने फिर्याद दिली आहे. दत्तात्रय वावरे यांच्या बाळावर जीवन हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने बाळाला आयसीयुमध्ये उपचार करण्यात येत होते. दत्तात्रय वावरे व त्यांच्या पत्नी वॉर्डाच्या बाहेर बाकड्यावर बसले होते.

रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डॉ. रमेश सोनवणे, त्यांचा मुलगा डॉ. भूषण सोनवणे, पुतण्या हर्षल सोनवणे हे आले.
त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करुन दमदाटी केली.
त्यांच्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती असतानाही त्यांनी आयसीयु वॉर्डला ऑक्सिजन पुरवठा करणार्‍या पाईपचा कॉक बंद करुन बाळाच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Pimpri News | Shocking! Attempt to kill baby in ICU by turning off oxygen cock, FIR against three including doctor father son

हे देखील वाचा

State Bank of India | कामाची गोष्ट ! बँकेत ‘फाटलेल्या’ अन् ‘कुजलेल्या’ नोटा बदलून मिळतात, पण प्रत्येक नोटसाठी द्यावं लागतं ‘एवढं’ शुल्क, जाणून घ्या

Gold Rate Today | 10,000 रुपये स्वस्त मिळतंय सोनं ! जाणून घ्या मुंबईसह प्रमुख शहरातील दर

Congress | काँग्रेस नेत्याचा शिवसेनेला सवाल, म्हणाले – ‘आमची स्वबळावर लढण्याची इच्छा पण तुम्हाला का मिरच्या झोंबतात?’

FYJC | राज्यात 10 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत, 11 वी प्रवेशासाठी CET ची घोषणा