Pimpri News : सामाजिक सुरक्षा विभागाचा जुगार अड्ड्यावर छापा, 23 जणांवर FIR

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिचंवडच्या सामजिक सुरक्षा विभागाने अवैधरित्या सुरु असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 23 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.18) निगडी येथील स्मशानभूमीच्या पाठिमागे करण्यात आली. पोलिसांनी 21 जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 1 लाख 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विजय साहेबराव शेलार (वय-26 रा. पंचशिल हौ.सोसायटी, निगडी) याच्यासह 20 जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या 21 आरपींना जामीनावर सोडण्यात आले आहे. तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक मारुती महादेव करचुंडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील स्मशानभूमीच्या पाठिमागे अवैधरित्या रम्मी जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून छापा टाकण्यात आला. त्यावेळी पत्र्याच्या शेडमध्ये 23 जण रम्मी जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी 21 जणांना ताब्यात घेऊन 1 लाख 70 हजार 360 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 56 हजार 260 रुपयांची रोख रक्कम, 1 लाख रुपये किंमतीचे 18 मोबाइल, 16 हजार 100 रुपयांचे जुगार साहित्य जप्त केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, डॉ. अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक पोलीस फौजदार विजय कांबळे, पोलीस हवालदार सुनिल शिरसाठ, नितीन लोंढे, आनंद यादव, भगवंता मुठे, महेश बारकुले, दिपक साबळे, अनिल महाजन, गणेश कारोटे, अमोल शिंदे, नामदेव राठोड, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, मारोतराव जाधव, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने, योगिनि कचरे यांच्या पथकाने केली.