Pimpri News | बदनामी केल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; निगडी पोलिसांनी केली चौघांना अटक

पिंपरी न्यूज (Pimpri News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बदनामी केल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून एका २८ वर्षाच्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन निगडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

संगमेश्वर गंगाधर येवते (वय ३२, रा. खंडोबा माळ चौक, आकुर्डी), भोनुप्रसाद हंसराज जैस्वाल (वय २९, रा. सुभाष पांढारकरनगर, आकुर्डी), विश्वजीत मधुकर मेढे (वय ३०, रा. पंचतारानगर, आकुर्डी), आकाश घाडगे (रा. पंचतारानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अमित रमेश गोसावी (वय २८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आकुर्डीतील ज्ञानेश्वर कॉलनीत १८ जून रोजी सकाळी पावणे सात ते साडेनऊ दरम्यान घडली.

याप्रकरणी रमेश वसंत गोसावी (वय ५०, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.
अमित रमेश गोसावी याने रहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी निगडी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती.
आत्महत्या करण्यापूर्वी अमित गोसावी याने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली.
त्यात त्यांनी चारही आरोपींची नावे लिहून त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.
यावरुन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price | 28 दिवसात पेट्रोल 7.1 रुपये आणि डिझेल 7.50 रुपयांनी झाले महाग, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील दर

Gold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या

1 जुलैपासून बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम ! खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pimpri News | Suicide by strangling a young man for defamation; Nigdi police arrested four persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update