Pimpri News : दुचाकी चोरुन नेल्याच्या आरोपामुळे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : न सांगता दुचाकी घेऊन गेल्याने चोरीचा आळ आणलेल्या तरुणाने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपातून वाकड पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

विशााल पोपट आढाव (रा. मधुबन कॉलनी, जगताप डेअरी, वाकड) आणि तेजस विजय शिंदे (रा. मानकर चौक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अजय बबन पडघाण (वय २८, रा. मधुबन कॉलनी, जगताप डेअरी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी हिम्मत चैनाराम सोलंकी (वय ३४, रा. सोलंकी निवास, वाकड) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना वाकडमधील मानकर वस्तीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली होती.

अजय पडघाण हा मुळचा वाशिम तालुक्यातील जुमंडा गावाचा रहिवासी आहे. तो येथे सिक्युरिटीचे काम करत होता. त्याने विशाल आढाव याची दुचाकी न सांगता घेऊन गेला होता. त्यामुळे दोघे जण पोलिसांकडे गेले होते. त्यावेळी तेथे अजय याने मी गाडी चोरली नाही, माझे कामानिमित्त घेऊन गेलो होतो, असे सांगितले. या कारणावरुन विशाल व तेजस याने त्याला हाताने मारहाण केली होती. आपली बदनामी झाली व त्यामुळे नैराश्य आल्याने अजय याने वाकडमधील एका पत्र्याच्या शेडमध्य १९ फेब्रुवारी रोजी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने दोन चिठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यात या दोघांनी त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त कले असे म्हटले आहे.