Pimpri News : दुर्देवी ! पिंपरी-चिंचवडमधील पोलिस कर्मचार्‍याचं कावीळमुळं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्यांचे कावीळमुळे निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

पोलीस शिपाई उमेश जाधव असे निधन झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

उमेश जाधव हे दिघी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. दरम्यान त्यांना ताप आल्याने दोन दिवसांपूर्वी (30 जानेवारी) येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. दरम्यान यानंतर त्यांना कावीळ झाल्याचे निधान झाले. उपचार सुरू असताना आज जाधव यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.