Pimpri News : ‘भांडणात मध्ये पडून मला का नाही वाचवलं’, म्हणत तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही लोक मला मारत असताना तून भांडणात पडून मला का नाही वाचवले असे म्हणत एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.12) सायंकाळी साडेपाच वाजता सेनेट्री चाळ पिंपरी येथे घडली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि.13) पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल मनोज लोट (वय-23 रा. सेनट्री चाळ, पिंपरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हर्ष उर्फ लाड्या अमर बहोत (वय-18 रा. सेनट्री चाळ, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी फिर्यादी हे पिंपरी येथील दुर्गामाता मंदिराजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी हर्ष याला भाटनगर येथील काही लोक मारहाण करत होते.

आरोपीने फिर्यादी यांना मला काही लोक मारत असताना तू तिथे हजर असताना तू माझ्या भांडणामध्ये पडून मला का वाचवले नाही, असे म्हणत शिविगाळ केली. आता मी तुझे हातपाय तोडणार आहे, तुला आता कोण वाचवतो ते मी पाहतो अशी धमकी देत आरोपीने फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये फिर्यादी यांच्या गाल, कान आणि डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.