महाविद्यालयीन विद्यार्थिनीने चालवला एक दिवस पोलीस ठाण्याच्या ‘कारभार’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि विमेन हेल्पलाईनच्या वतीने एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एक दिवस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तृप्ती निंबळे या विद्यार्थीनीला ही संधी मिळाली. पोलीस गाडीतून तिचे चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आगमन झाले. सर्वांनी तिचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विमेन्स हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेशी तसेच चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे, बिर्ला हॉस्पिटलच्या डॉ. अन्नपूर्णा कालिया, डॉ. रेश्मा रणसिंग, पोलीस अधिकारी रोहिणी शेवाळे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस महिलांचे अत्याचार वाढत चालले आहेत महिला या महिलांना न्याय देऊ शकतात या धर्तीवर ही संकल्पना राबवण्यात आली होती. तृप्ती निंबळे म्हणाली जास्तीत जास्त महिलांनी प्रशासकीय सेवेमध्ये यायला पाहिजे. एक दिवसीय पोलीस अधिकारी बनविण्याचं स्वप्न पूर्ण झालेली तृप्ती म्हणाते मला खरंखूर पी.एस.आय व्हायचं आहे.

याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. बिर्ला हॉस्पिटल आणि सुखकर्ता लॅब यांच्यावतीने महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर व विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या सरिता साने, सुषमा वैद्य, दीपाली येवले, गायत्री ढवळे, जनाबाई काकडे, पोलीस कर्मचारी रुपाली पुजारी, नीतू चामले या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.