पिंपरी पोलीस दलातील एक पोलीस उपायुक्त Corona पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर आयुक्तालयातील 412 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 48 अधिकारी आणि 363 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा 30 ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहर पोलीस दलातील 48 अधिकारी आणि 363 पोलीस कर्मचारी असे एकूण 412 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 43 अधिकारी आणि 316 कर्मचारी कोरोनामुक्त देखील झाले आहेत. सध्या 5 अधिकारी आणि 47 कर्मचाऱ्यांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा जनतेशी थेट संबंध येत असल्याने कोरोनाचा पोलिसांना अधिक धोका आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी खबरदारी घ्यावी लागत आहे. कोरोनाची खबरदारी घेणे, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही तिहेरी कसरत पोलिसांना करावी लागत आहे.