Coronavirus : पिंपरी पोलिस दलातील आणखी एक पोलिस उपायुक्त कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एक पोलीस उपायुक्त यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर आयुक्तालयातील 448 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 404 कोरोना मुक्त झाले आहेत. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा 30 ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहर पोलीस दलातील एकूण 448 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 404, अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त देखील झाले आहेत. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांचा जनतेशी थेट संबंध येत असल्याने कोरोनाचा पोलिसांना अधिक धोका आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी खबरदारी घ्यावी लागत आहे. कोरोनाची खबरदारी घेणे, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही तिहेरी कसरत पोलिसांना करावी लागत आहे.