Coronavirus : पिंपरी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस दलात आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या १६ झाली असून १३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या देहूगाव येथून संत तुकाराम महाराज तर आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बसने पंढरपूर येथे रवाना झाल्या. त्या पार्श्वभूमीवर पालखी सोबत रवाना होणाऱ्या पोलिसांचीकोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर यासह सुरक्षा साधनांचा वापर करावा, तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like