Pimpri PCMC News | पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे कुणबी जात प्रमाणपत्राच्या कार्यवाहीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

पिंपरी : Pimpri PCMC News | राज्य शासनाच्या (State Govt) निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र (Maratha Kunbi Caste Certificate) देण्याबाबत आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने महापालिकेशी (Pimpri PCMC News) संबंधित अभिलेखांमध्ये उपलब्ध पुराव्यांची वैधानिक, प्रशासकीय तपासणी करून दस्तावेजांची पुर्तता करून घेण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली आहे.

आयुक्त शेखर सिंह (IAS Shekhar Singh) यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात आयुक्तांनी स्वतंत्र आदेश काढला आहे. राज्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करणे, तपासणी अंती कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून अहवाल शासनास सादर करण्याकामी निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे (Retired Justice Sandeep Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १९४८ ते १९६७ या कालावधीतील
जन्म-मृत्यु नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके तसेच महापालिकेने केलेल्या कर
आकारणी रजिस्टरमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून त्याबाबतचा अहवाल
शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सादर करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

महापालिकेने निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
तसेच या कामाच्या दृष्टीने महापालिकेच्या संबंधित विभागांना काही आदेश देखील दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde On Chhagan Bhujbal | CM शिंदेंनी स्पष्ट शब्दात भुजबळांना सुनावले, कुणीही संभ्रम पसरवायची आवश्यकता नाही, ‘सरकार…’

Pune Crime News | कार्ड इन्शूरन्स कॅन्सल करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक, हिंजवडीमधील प्रकार