‘उद्योगनगरी’ पिंपरी पुर्णपणे ‘जलमय’ ! अडकलेल्या 70 कुटूंबाला ‘सुखरूप’ बाहेर काढलं

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये पडत असलेल्या मुसळाधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागल्या आहेत. वाकडे येथील सहारा हॉटेलच्या मागे अडकलेल्या एका कुटुंबाला वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करून सुखरुप बाहेर काढले. तर वाकड येथील स्मशानभुमीमध्ये अडकलेल्या चार तरूणांना पोलीस आणि अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढले. पावसाचा जोर वाढत असल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुळशी आणि पवना ही दोन्ही धरेणे १०० टक्के भरल्याने या दोन्ही धराणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड आणि सांगवीमध्ये पाणी शिरले असून या भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती व्यवस्थापनाने ४० ते ४५ कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

पिंपरीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात पाणी शिरले आहे. तर वाकड येथील मानकर चौकात देखील पाणी साठल्याने या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याच बरोबर मुळशी, ताम्हीणी घाटाकडे जाणाऱ्या केळवण रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाह्तूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षा विहारासाठी ताम्हीणी घाटात जाणाऱ्या पर्यकटाकांचा हिरमोड झाला आहे.

शहरात पडत असलेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत तर सांगवी, कस्पटे वस्ती, विशालनगर, पिंपळे निलख, पंचशील नगर, आदर्श नगर, शितोळे नगर या भागातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात येत आहे. दरम्यान जुन्या सांगवी परिसरात धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये पाणी शिरलं असून याठिकाणी रहिवासी अकडले होते. पोलिस आणि अग्निशामन दलाने जवळपास ७० रहिवाशांना सुखरूप बाहेर काढलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त –