Pimpri Police | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणखी एका पोलीस ठाण्याला मान्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलात (Pimpri Police) आणखी एका पोलीस स्टेशनला मान्यता मिळाली आहे. राज्याच्या गृह विभागाने (Home Department) म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करुन म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची (Pimpri Police) निर्मीती करण्यात येणार आहे. याबाबत शुक्रवारी (दि.8) रात्री उशीरा अध्यादेश काढण्यात आला आहे.

म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यातील रावेत पोलीस ठाण्याला (Ravet police station) यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.
त्यानंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला (Mahalunge MIDC Police Station) ही गृह विभागाने मान्यता दिली आहे.
राज्याच्या वित्त विभागाने (finance department) खर्चाला मान्यता दिली आहे.
त्यानंतर राज्यच्या गृहविभागाकडून प्रस्तावीत नवीन पोलीस ठाण्याला परवानगी देण्यात आली.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Commissionerate) मंजूर संख्याबळातून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी पदे मंजूर करण्यात आली आहेत.

67 पदे उपलब्ध करुन देण्यास मान्यता

(Pimpri Police) नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक (Police inspector), 3 सहायक पोलीस निरीक्षक (API), 5 उपनिरीक्षक (PSI),
3 सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI), 10 हवालदार, 13 पोलीस नाईक, 32 पोलीस शिपाई अशी एकूण 67 पदे उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे.
तसेच या पोलीस ठाण्यासाठी आणखी आवश्यक असलेली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक 2, सहायक पोलीस उपनिरीक्षक 12, पोलीस हवालदार 20,
पोलीस नाईक 22, पोलीस शिपाई 38, सफाई कामगार 2 अशी एकूण 98 पदे 28 मे 2018 रोजी शासन निर्णयान्वये
पिंपरी चिंचवड आयुक्तालयासाठी तीन टप्प्यांत मंजूर करण्यात आलेल्या मनुष्यबळातून पुरवण्यास मानय्ता दिली आहे.

 

नवीन इमारतीसाठी 2 कोटी

पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च येणार आहे.
त्यासाठी स्वतंत्रपणे प्रशासकीय मान्यता देण्यात यावी,असे अध्यादेशात नमूद केले आहे.
तसेच महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी येणारा 27 लाख 95 हजार 400 रुपयांच्या उर्वरीत खर्च पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपलब्ध मंजूर अनुदानातून करण्यात यावा

 

Web Title : pimpri police | approval mahalunge midc police station in Pimpri Chinchwad police Commissionerate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Param Bir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सस्पेन्स कायम ! क्राइम ब्रँचनं उचललं ‘हे’ पाऊल

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये

Bloomberg Billionaires Index | Elon Musk, Jeff bezos, Bill Gates यांच्या 100 अरब डॉलरच्या क्लबमध्ये सहभागी झाले मुकेश अंबानी